रेव्ह पार्टी प्रकरण ; न्यायालयीन कोठडीत असलेल्या पतीला वाचवण्यासाठी रोहिणी खडसेंची धडपड ; शरद पवारांच्या भेटीला..


पुणे : पुण्यातील खराडी भागात रेव्ह पार्टी सुरू असताना पोलिसांनी छापेमारी केली आणि एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक केली. याप्रकरणी आता कोर्टाने नाथाभाऊंच्या जावयासह 4 जणांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या पतीला वाचवण्यासाठी रोहिणी खडसे या शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्या आहेत.या भेटीमध्ये काय चर्चा होते, शरद पवार या सर्वांवर काही भाष्य करतात का? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रांजल खेवलकरांच्या नावानेच पार्टीसाठी रूम बुक करण्यात आली. या पार्टीतील काही फोटो आणि व्हिडीओ देखील पुढे आले. धक्कादायक बाब म्हणजे पुरूषांसोबतच काही महिलांचा देखील या रेव्ह पार्टीत सहभाग होता. सध्या रेव्ह पार्टी प्रकरणी सात जण कोठडीत असून त्यांना पुणे कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.दरम्यान खेवलकरचा जामिनासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. हेच नाही तर कालच खेवलकरांच्या जामिनासाठी कोर्टात अर्ज दाखल केला जाईल, अशी चर्चा होती. या पार्टीतून पोलिसांना कोकेन आणि गांजा मिळाला आहे. यासोबतच दारूच्या बाटल्या देखील पोलिसांनी पार्टीतून जप्त केल्या आहेत.

याप्रकरणी पुणे पोलिसांनी कोर्टात सांगितले की, आरोपी प्रांजल खेवलकर याच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह चॅट आणि व्हिडीओ सापडली आहे. त्याने दुसऱ्या आरोपी मेसेज करून माल आण असे म्हटले आहे. यासोबतच मुलीचा व्हिडीओ शेअर करत असा माल पाहिजे असल्याचे म्हटले. त्यामुळे आता प्रांजल खेवलकर यांच्या अडचणी वाढणार का हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!