Ratan Tata : रश्मीकानंतर आता रतन टाटा यांचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल, उडाली खळबळ, व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे?

Ratan Tata : गेल्या काही दिवसांपासून एकामागून एक डीपफेक व्हिडीओ समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि बॉलिवूड अभिनेत्री कटरिना कैफ यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

आता चक्क प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल होत असणाऱ्या व्हिडिओमध्ये रतन टाटा ऑनलाइन सट्टेबाजी प्रशिक्षकाचे समर्थन करत आहेत.
त्याशिवाय ते लोकांना आमिर खान नावाच्या व्यक्तीचे टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यास सांगत आहेत. या व्हिडिओमुळे अनेकांना धक्का बसला आहे. ऑनलाइन बेटिंगबाबत संदिग्ध व्यक्तींना फसवण्यात येत आहे. Ratan Tata

या व्हिडिओमध्ये रतन टाटा असे म्हणत आहे की, लोक मला प्रत्येक वेळी विचारतात की, तुम्ही श्रीमंत कसे झालात? तर मी तुम्हाला माझा मित्र आमिर खान याच्याविषयी सांगू इच्छितो. भारतामध्ये अनेक लोकांनी एव्हिएटर खेळून लाखो रुपयांची कमाई केली आहे. त्याचे प्रोग्रॅमर, विश्लेषक आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे आभार, यात जिंकण्याची शक्यता ९० टक्क्यांहून अधिक आहे.
रतन टाटांसारख्या आदरणीय उद्योगपतींचा डीपफेक व्हिडीओ तयार करून दिशाभूल करण्याच्या या प्रकारामुळे आर्थिक फसवणूक आणि घोटाळ्यांसाठी डीपफेड व्हिडीओंचा वापर कसा केला जाऊ शकतो, हे समोर येत आहे.