Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूरने पुण्यात घेतला फ्लॅट, महिन्याचे भाडे ऐकून डोळे होतील पांढरे…

Ranbir Kapoor पुणे : बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी ‘एनिमल’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. अशामध्ये तो पुन्हा एकदा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. रणबीर कपूर याने पुणे (Pune) शहरात राहण्यासाठी फ्लॅट भाड्याने घेतला आहे. याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. (Ranbir Kapoor)
पुण्यातील (Pune) अलिशान असलेल्या ट्रम्प टॉवरमध्ये फ्लॅट रणबीर याने घेतला आहे. या फ्लॅटसाठी रणबीर कपूर (Ranbir Kapoor) दर महिन्याला भाडे म्हणून जी रक्कम देत आहे ती ऐकून सर्वजण आश्चर्यचकीत झाले आहेत.
पुणे येथील ट्रम्प टॉवर ही देशातील सर्वात महाग बिल्डींग आहे. अमेरिकेसह जगातील अनेक देशात या पद्धतीचे टॉवर आहेत. पुण्यातील या टॉवरमध्ये अनेक चर्चित व्यक्ती राहतात.
रणबीर कपूर (Ranbir Kapoor) या फ्लॅटसाठी लाखो रुपये महिन्याला भाडे देत आहे. रणबीर एका महिन्यासाठी ४ लाख रुपये असे करून वर्षाला ४८ लाख रुपये भाडे देत आहे. मनी कंट्रोलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, रणबीर कपूरने हा फ्लॅट एकूण तीन वर्षांसाठी भाड्याने घेतला आहे.
यासंदर्भात करार देखील झाला आहे. त्याचे भाडे पहिल्या वर्षी ४ लाख रुपये प्रति महिना, दुसऱ्या वर्षी ४.२० लाख रुपये आणि तिसऱ्या वर्षी ४.४१ लाख रुपये प्रति महिना ठरवण्यात आले आहे. रणबीर कपूरने घेतलेला फ्लॅट ट्रम्प टॉवरच्या १० व्या मजल्यावर आहे. पुण्यात स्थित असलेला हा ट्रम्प टॉवर २३ मजल्यांचा आहे.