Rajkot Fort : मोठी बातमी! सिंधुदुर्गातील शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी अखेर डॉ. चेतन पाटीलला अटक..


Rajkot Fort : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा काही दिवसांपूर्वी पडला. यामुळे तमाम शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे.

याप्रकणी आता पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या दोन व्यक्तींपैकी चेतन पाटील यांना कोल्हापूरमधून अटक करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग पोलिसांनी कोल्हापूरमधून चेतन पाटील याला ताब्यात घेतले.

मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ असलेल्या राजकोट येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे. तसेच या घटनेविरोधात विरोधी पक्ष आणि शिवप्रेमींकडूना आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे.

दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा पुतळा उभारण्याचं कंत्रात मेसर्स आर्टिस्ट्री कंपनीला देण्यात आलं होतं. जयदीप आपटे हे या कंपनीचे मालक, तर चेतन पाटील हे सल्लागार आहेत. Rajkot Fort

या दोघांविरोधात पुतळा कोसळल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरा कारवाई करत पोलिसांनी चेतन पाटील याच्यावर अटकेची कारवाई केली. तर चेतन आपटे हा ही दुर्घटना घडल्यापासून फरार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!