Rajendra Patni : मोठी बातमी! भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन, दीर्घ आजाराशी झुंज अपयशी, ५९ व्या वर्षी अखेरचा श्वास…


Rajendra Patni : भारतीय जनता पक्षाचे आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. राजेंद्र पाटणी हे गेल्या दोन-तीन वर्षांपासून आजारी असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यातच आज त्यांची प्राणज्योत मालवली.त्याच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. पाटणी यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये लिहिले की, अत्यंत दुःखद बातमी: विधानसभेतील माझे सहकारी राजेंद्र पाटणीजी यांचे आज निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. ते या संकटातून बाहेर पडतील, अशी आम्हा सर्वांना आशा होती. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली.ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपाने गमावला आहे. Rajendra Patni

पश्चिम विदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे, म्हणून ते सतत आग्रही असायचे. त्यांचे निधन ही माझी वैयक्तिक हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबीयांना मिळावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!