Raj Thackeray : महाराष्ट्र असं एकमेव राज्य आहे जिथे अर्धा पक्ष सत्तेत अन् अर्धा पक्ष विरोधात! राज ठाकरेंचा राज्य सरकारला टोला
Raj Thackeray मुंबई : राज्याच्या राजकारणात अनेक नवीन घड्यामोडी घडत असतात. विरोधक सतत एकमेकांवर टीका करत असतात. सध्या यावर राज ठाकरे यांनी देखील भाष्य केले आहे. राज ठकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. Raj Thackeray
महाराष्ट्रात जो पक्ष सत्तेत तोच पक्ष विरोधात अशी विचित्र आणि घाणेरडी परिस्थिती आहे अशी टीका राज ठाकरेंनी केलीय. अशी स्थिती जगाच्या पाठीवर केवळ महाराष्ट्रात आहे असंही राज ठाकरे म्हणाले. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीच्या पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या शिबिरात बोलताना राज यांनी ही टीका केली.
पुढल्या वर्षी मुंबईत आणि कोकण पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसंदर्भात आज बैठक आहे. भारत काय इंडिया काय की हिंदुस्तान काय … एकमेव देश आहे की जिथे अशाप्रकारची लोकशाही आहे. महाराष्ट्रात घाणेरडी परिस्थिती झाली आहे. अर्धे पक्ष सत्तेत अर्धा पक्ष बाहेर आले.
महाराष्ट्र एकमेव राज्य आहे जिथे सत्तेत आणि विरोधात एकच पक्ष आहे. सत्तेतही शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि विरोधातही शिवसेना राष्ट्रवादी, असे राज ठाकरे म्हणाले.
देशातील एकमेव देश असेल जिथे अशी लोकशाही चालते फाॅर्मवर लिहिलेलं होतं सही किंवा अंगठा मतदार पदवीधर असला पाहिजे, मात्र उमेदवाराकडे पदवी नसली तरी चालते. उमेदवार शिक्षक असला पाहिजे की नाही ते माहिती नाही पण मतदार शिक्षक असला पाहिजे अजूनही तसंच आहे, असे राज ठाकरे म्हणाले.