Rain Update : गणपती विसर्जन मिरवणुकीत पडणार धो- धो पाऊस, या ठिकाणी अलर्ट जारी..


Rain Update  पुणे : यंदा मान्सून उशिराने सुरु झाला. राज्यात २५ जून रोजी मान्सून दाखल झाल्यानंतर जुलै महिन्यात मुसळधार बरसला. त्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत असताना ऑगस्ट महिन्यात पावसाने सुट्टी घेतली. यामुळे चिंतेचे वातावरण तयार झाले होते. सप्टेंबर महिन्यात पुन्हा जोरदार पाऊस सुरु झाला. (Rain Update)

गणरायाच्या आगमनच्या प्रसंगी राज्यात सर्वत्र पावसाचे आगमन झाले. राज्यातील अनेक भागात दररोज मुसळधार पाऊस होत आहे तर काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी देखील कोसळत आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

तसेच आज हवामान विभागाने दक्षिण कोकणामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रात, कोकणात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार तर उर्वरित राज्यांमध्ये तुरळकी ठिकाणी पाऊस (Rain Update) पडणार असल्याचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये असे देखील आवाहन करण्यात येत आहे.

राज्यात सर्वत्र चांगला पाऊस सुरु आहे. पावसाचा जोर अजून चार दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागने व्यक्त केला आहे. गुरुवारी गणेश विसर्जनाच्या दिवशी पुणे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर इतर अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम स्वरुपाचा पाऊस असणार आहे. जळगाव, नंदुरबार जिल्हा वगळता इतर सर्व ठिकाणी यलो अलर्ट दिला आहे.

दरम्यान आज दक्षिण कोकणामधील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्याचबरोबर कोकणामधील ठाणे, रायगड मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

या ठिकाणी हवामान विभागाने अलर्ट देखील जारी केला आहे. विदर्भासह उर्वरित कोकण, मध्यमहाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळकी ठिकाणी पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!