Railway News : पुणे – कोल्हापूर विशेष रेल्वे होणार सुरु, असे असेल वेळापत्रक, जाणून घ्या…

Railway News : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे-कोल्हापुर-पुणे दरम्यान विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्र. 01023 पुणे – कोल्हापुर एक्स्प्रेस दिनांक ०६ नोव्हेंबर २०२३ ते ०१ जानेवारी २०२४ या कालावधीत पुण्याहून दररोज २१.४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 05.40 वाजता कोल्हापुरला पोहोचेल.

गाडी क्र. 01024 कोल्हापुर – पुणे एक्सप्रेस दिनांक 05 नोव्हेंबर ते 31डिसेंबर दरम्यान कोल्हापुर येथून दररोज 23.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 07.45 वाजता पुण्याला पोहोचेल. Railway News
मार्गात ही गाडी सासवड रोड, जेजुरी, नीरा, लोणंद , वाठार, सातारा, कोरेगाव, रहिमतपूर, तारगाव, मसूर, कराड, ताकारी, किर्लोस्करवाडी, भिलवडी, सांगली, मिरज, जयसिंगपूर, हातकणंगले, रुकडी आणि वलिवडे स्टेशन वर थांबेल.

या गाडीला सामान्य श्रेणी 04, स्लीपर07, थ्री एसी04, आणि सेकंड एसी 01 कोच असतील. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. रेल्वे प्रशासन कोल्हापूर -पुणे दरम्यान सह्याद्री एक्स्प्रेस सुरू करण्याच्या प्रयत्नात आहेत. तत्पूर्वीच रेल्वे प्रशासन दिवाळीच्या काळात पुणे-कोल्हापूर-पुणे अशी विशेष रेल्वे सुरू करीत आहे.