Raigad : किल्ले रायगड शिवरायांच्या जयघोषात दुमदुमला!! शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा…

Raigad रायगड : शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या ३५१ वर्षारंभानिमित्त आज (२० जून) स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर आयोजित विविध कार्यक्रमांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहभाग घेतला.
तसेच स्वराज्यसंस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ माँसाहेब, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचे, विचारांचे, पराक्रमाचे स्मरण करून स्वराज्य निर्मितीसाठी रक्त सांडणाऱ्या, जिवाची बाजी लावणाऱ्या सह्याद्रीच्या मावळ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृतज्ञतापूर्ण वंदन केले. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त देशभरातील तमाम शिवप्रेमींना, शिवभक्तांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या. Raigad
Views:
[jp_post_view]