Rahul Kul : आमदार राहुल यांनी घेतली केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट, पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ‘आरक्षित वन जमीन’ शेरा उठविण्यासंदर्भात केली मागणी..


Rahul Kul : प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवरील ‘आरक्षित वन जमीन’ शेरा उठविण्यासंदर्भात केंद्रीय कामगार आणि रोजगार ,पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची आमदार राहुल दादा कुल यांनी दिल्ली येथे भेट घेतली आहे.

१९८० चा वन संवर्धन कायदा लागू होण्यापूर्वी विविध प्रकाल्पामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना महसूल विभागाद्वारे सुमारे १०,००० हेक्टर वन जमिनीचे वाटप करण्यात आले असून पुणे इंदापूर, बारामती आणि दौंड तालुक्यातील सुमारे १५००० शेतकऱ्यांच्या जमिनीवर ‘आरक्षित वन जमीन’ शेरा अद्याप कायम आहे. Rahul Kul

निर्वनीकरणाची प्रक्रिया अतिशय क्लिष्ट असल्याने प्रकल्प ग्रस्त शेतकरी त्यांच्या हक्काच्या जमिनीच्या मालकी हक्कापासून अद्याप वंचित असून ‘आरक्षित वन जमीन’ शेरा हटविण्यासाठी गेले ४० वर्षे शेतकरी बांधव वन आणि महसूल विभागाच्या फेऱ्या मारत आहेत तेव्हा या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवरील ‘आरक्षित वन जमीन’ शेरा उठविण्यासाठी केंद्र शासनाने कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी राहुल कुल यांनी केली आहे.

दरम्यान, यावेळी, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार भाऊ गोरे उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!