राहुल गांधींनी लोकसभेमध्ये भाषणात मोदी अदानी यांची छायाचित्रे दाखवली…!
नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी लोकसभेत भाषण करताना पंतप्रधान मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांची छायाचित्रे दाखवली. त्यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिडला संतापले आणि म्हणाले की, पोस्टरबाजी बंद करा, अन्यथा सत्ताधारी पक्षाचे लोक राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि अदानी यांचे एकत्र चित्र दाखवतील.
2014 मध्ये अदानी 609 व्या क्रमांकावर होते, मग असे काय झाले की ते दुसऱ्या क्रमांकावर आले, यादरम्यान राहुल गांधी म्हणाले की, 2014 मध्ये अदानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 609 व्या क्रमांकावर होते, जादू झाली की नाही माहित नाही आणि ते दुसऱ्या क्रमांकावर आले. लोकांनी विचारले हे यश कसे मिळाले? आणि त्यांचा भारताच्या पंतप्रधानांशी काय संबंध? मी तुम्हाला सांगतो की, हे नाते अनेक वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना सुरू झाले होते.
Views:
[jp_post_view]