Pushpa 2 Teaser : पुष्पा २ चा राडा करणारा टिझर रिलीज!! पायात घुंगरू, डोळ्यात आग अन् उधळला गुलाल, प्रेक्षक भारावले, पाहा टीझर..
Pushpa 2 Teaser : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या त्याच्या आगामी ‘पुष्पा २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त आज ‘पुष्पा २’चा चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज करण्यात आला आहे. सर्वचजण या टीझरची आतुरतेने वाट पाहत होते.
येत्या १५ ऑगस्ट रोजी ‘पुष्पा २ : द रूल’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टीझर रिलीज करण्यापूर्वी या चित्रपटाचं एक पोस्टर शेअर केले होते. यात अल्लू अर्जुन पुष्पाच्या अंदाजात पाहायला मिळाला होता.
या पोस्टरमध्ये अल्लू अर्जुनच्या हातात कुऱ्हाड होती. तो पुष्पा स्टाइलमध्ये सिंहासनावर बसला होता. त्याचा हा लूक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा आहे. रिलीज केलेल्या टीझरमध्ये पायात घुंगरू, डोळ्यात आग, हातात त्रिशूल आणि अर्धनारीच्या लूकमध्ये पुष्पाचा जबरदस्त अवतार पाहायला मिळत आहे.
५०० कोटींच्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती केली आहे. देशातील बिग बजेट चित्रपटांमध्ये ‘पुष्पा 2’चा समावेश आहे. चित्रपट पुष्पा : द राइज याचा सीक्वेल असून टीझरवरून चित्रपट कोटींचा गल्ला जमवणार, हे जवळपास निश्चित आहे. Pushpa 2 Teaser
अल्लू अर्जुन आज आपला ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे. अल्लू अर्जुनला सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. ‘पुष्पा’ चित्रपटानंतर अल्लू अर्जुनचा चाहतावर्ग वाढला.
आता दाक्षिणात्य सुपरस्टारच्या आगामी चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता आहे. टीझर रिलीज करण्याआधी एक पोस्टर शेअर करण्यात आले होते. यात अल्लू अर्जुन ‘पुष्पा’च्या अंदाजात दिसून आला होता. अल्लू अर्जुनच्या हातात कुऱ्हाड होती. ‘पुष्पा’ स्टाइलमध्ये तो सिंहासनावर बसलेला दिसून आला होता.