पंजाबरावांचा शेतकऱ्यांसाठी खास मेसेज!! पुढच्या महिन्यातील शेतीची कामे उरका, ‘या’ तारखेपासून अवकाळी पाऊस होणार सुरू, जाणून घ्या…


पुणे : फेब्रुवारी महिन्यात राज्यात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. याबाबत हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज दिला आहे.

या अंदाजानुसार फेब्रुवारीच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. एक फेब्रुवारी नंतर राज्यातील हवामान बिघडणार आणि त्यानंतर अवकाळीला सुरुवात होणार असल्याचे पंजाबराव म्हणाले. राज्यात 2 फेब्रुवारीपासून राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे.

शेतकऱ्यांनी यामुळे एक फेब्रुवारीपर्यंत आपली शेतीची कामे पूर्ण करून घ्यावीत. 2 फेब्रुवारी पासून ते 4 फेब्रुवारी पर्यंत राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. यामुळे आपल्या पिकांचे नुकसान होऊ शकते, असेही ते म्हणाले. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेतकऱ्यांनी गहू, हरभरा काढणी सारखी महत्त्वाची कामे पूर्ण करून घ्यावीत. 2 फेब्रुवारी नंतर पुढील तीन-चार दिवस अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती राहणार आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक तसेच आंबा उत्पादक देखील चिंतेत आहेत.

दोन, तीन आणि 4 फेब्रुवारी रोजी राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज आहे. यामुळे शेतकऱ्यांनी काढणीला आलेली पिके लवकरच काढून घ्यावीत असेही सांगण्यात आले आहे. नाहीतर नुकसान होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जानेवारी महिन्यात राज्यात कुठेच फार मोठा अवकाळी पाऊस झाला नाही आणि यामुळे शेतकऱ्यांचे फारसे नुकसान झाले नाही. फक्त काही भागांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळाले, यामुळे पुढील महिन्यात पाऊस होईल असे सांगितले जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!