पुण्यातील ट्रॅफिक जॅमला कायमचा रामराम ; तब्बल 1100 कोटींचा गेमचेंजर प्रोजेक्ट..


पुणे: वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या पुणेकरांना आता वाहतूक कोंडीच्या कटकटीतून मोठा दिलासा मिळणार आहे. यासाठी लवकरच आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला जाणार आहे. शहरातील तब्बल 500 सिग्नल जंक्शनवर ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’उभारण्यात येणार आहे. यासाठी तब्बल 1100 कोटींचा खर्च केला जाणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, वाहतूक कोंडी मिटवण्यासाठीच्या तब्बल 1100 कोटींच्या प्रकल्पाचे काम पुढील तीन महिन्यात सुरू होणार आहे. नव्या प्रणालीत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक नियंत्रण अधिक सक्षम करण्यात येणार आहे. गाड्यांचा वेग, वाहनांची संख्या, प्रवासाचा कालावधी आणि पीक अवरमधील ट्रॅफिकचा सखोल अभ्यास या प्रणालीकडून होईल. त्यानुसार सिग्नल आपोआप समायोजित केले जातील. त्यामुळे सिग्नलवर होणारी अनावश्यक गर्दी टळेल आणि वाहतूक अधिक सुरळीतपणे सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, एआयच्या मदतीने सिग्नल सिंक्रोनायझेशन साधले जाणार आहे. यामुळे एका रस्त्यावरून दुसऱ्यावर जाताना वाहनांना सलग हिरवा सिग्नल मिळू शकतो. यामुळे प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. या प्रकल्पामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!