Pune Weather Update : पुण्यात पुढील चार दिवस जोरदार पाऊस, भारतीय हवामान विभागाकडून अपडेट, जाणून घ्या…
Pune Weather Update : पुण्यात २४ मे पर्यंत हलक्या ते मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या काळात वादळी वाऱ्यासह पाऊस पडेलस इसा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे.
पुण्यातील इंदापूर तालुक्यातील गावांमध्ये पावसानं काल हजेरी लावली होती. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुणे शहरात दिवसाचे तापमान ३८ ते ३९ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते.
हे तापमान पुढील काही दिवस कायम असेल. पुणे शहरात शिवाजीनगर आणि लोहेगावमध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसानं हजेरी लावलेली होती. रविवारी मात्र पावसानं हजेरी लावली नव्हती.
हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्रात आणि पुणे जिल्ह्यात चक्रीवादळाच्या अभिसरणाची स्थिती निर्माण झाली आहे. दुपारपर्यंत तापमानात वाढ जाणवेल, असे देखील सांगण्यात आले आहे. Pune Weather Update
या स्थितीमुळे वातावरणातील आर्द्रता वाढू शकते. वातावरणातील या बदलांमुळे शहरातील काही भागात सायंकाळच्या वेळी वादळी वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे, असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, पुण्यामध्ये अशा प्रकारच्या वातावरणाची स्थिती पुढील काही दिवस असेल, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील काही भागांमध्ये या काळात ४० ते ५० कि.मी. प्रति तास या वेगानं वारे वाहू शकतात, असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.