Pune Weather Update : काळजी घ्या! अवकाळी पावसाचा कहर, पुण्यात पुढील चार दिवस विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता…


Pune Weather Update : पुण्यातील अनेक भागामध्ये अवकाळी पावसानं थैमान घातल्याचे चित्र आहे. तसेच दिवसभर ऊन तर संध्याकाळच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह पाऊस बरसत आहे. एकीकडे ऊन्हापासून पुणेकरांना दिलासा मिळत असला तरी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होताना दिसत आहे.

पुढील चार दिवस विजांच्या पावसाचा अंदाड हवामान खात्याने वर्तवला आहे. काल दिवभर भारतीय हवामान खात्याने विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला होता त्यानंतर काल मतदान संपल्यानंतर लगेचच शहरात हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली.

आयएमडीच्या आकडेवारीनुसार, शिवाजीनगरमध्ये रात्री साडेआठवाजेपर्यंत २.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दिवसाची थंड सुरुवात झाल्यानंतर दुपारपर्यंत शहरात उष्ण आणि दमट वातावरण जाणवू लागले. मतदानासाठी आलेल्या अनेकांना उष्ण हवामानाचा त्रास सहन करावा लागला. Pune Weather Update

काहींनी तर मतदान केंद्रांवर अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी केल्या. मात्र, साडेपाचनंतर पुणे जिल्हा व परिसरात ढग तयार होऊ लागल्याने वातावरणात बदल झाला. पुण्यात विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस झाला आहे.

मात्र, पुणे शहरातील मतदानावर याचा फारसा परिणाम झालेला नाही. गेल्या चार दिवसांपासून पुणे शहरात पाऊस पडत असून, 11आणि १२ मे रोजी शहरात शिवाजीनगर २८ आणि ४०.४ मिमी येथे मुसळधार पाऊस झाला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!