पुणे विद्यापीठात उंदरांनी घातलाय राडा! चाव्यात अनेक विद्यार्थी जखमी, रेबिजचीही लक्षणे…

पुणे : पुणे विद्यापीठाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. विद्यापीठात उंदरांनी सुळसुळाट घातला आहे. पण प्रशासनाकडून कोणताही उपाययोजना केली जात नाही.उंदरांनी चावा घेतल्यामुळे विद्यार्थी जखमी झाला आहे.

इतकेच नाही तर पुणे विद्यापीठातील दोन विद्यार्थ्यांना रेबिज आजाराची लक्षणं दिसत आहे. विद्यापीठाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी असून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृह क्र.६ या ठिकाणी २ विद्यार्थ्यांना रेबिजची लक्षणे आढळून आली आहेत.
दरम्यान, या विद्यार्थ्यांच्या साहित्याची नासधूस झालेली आहे. तीन महिन्यांपूर्वी मुख्य वसतिगृह प्रमुखांना या बाबत तक्रार सुध्दा दिलेली होती. तरीसुद्धा या विषयात कोणतीच दखल घेतलेली नाही. या सर्व गोष्टीवरून वसतिगृह प्रशासनाचा निष्काळजी पणा दिसून येतो असा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून हिंदी विभागाचे आणि अर्थशास्त्र विभागाचे विद्यार्थी मुख्य वसतिगृह प्रमुखांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत तरी एकदाही या विषयाची दखल घेतली गेली नाही असं सुद्धा आरोप आता करण्यात आला आहे. एका विद्यार्थ्याच्या पायाला सलग चार वेळा चावा घेतला आहे.
दरम्यान, त्यामूळे त्या विद्यार्थ्याला २ दिवस हॉस्पिटल दाखल केले होते. त्यामधे रेबीज या रोगाचे लक्षणं आढळून आले. खाण्याचे पदार्थ, कपडे आणी पुस्तकं यांची नासधूस केलेली आहे असं विद्यार्थ्यांचे मत आहे.