याच महिन्यात मिळणार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला नवे कुलगुरू

पुणे : पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचा कुलगुरुपदाचा कार्यकाळ मे 2022 मध्ये संपला. त्यानंतर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्याकडे सोपविण्यात आला.
असे असताना विद्यापीठाच्या गेल्या वर्षभरापासून रिक्त असलेल्या कुलगुरुपदासाठी अर्ज करण्याची मुदत गुरुवारी संपली. यासाठी 16 उमेदवार इच्छुक आहेत. प्रक्रिया वेळेत पार पडली एप्रिलअखेर विद्यापीठाला नवीन कुलगुरू मिळणार
आहेत.
यासाठी आता विद्यापीठातूनच डॉ. संजीव सोनवणे, डॉ. प्रफुल्ल पवार, डॉ. विजय खरे, डॉ. विलास खरात, अंजली कुरणे, राजेश गच्छे, सुरेश गोसावी हे इच्छुक आहेत. यामुळे कोण कुलगुरू होणार हे लवकरच समजेल. अर्ज केलेल्या उमेदवारांमधून पात्र उमेदवारांचे अर्ज निवडण्यात येतील.
त्यानंतर 15 ते 20 एप्रिलपर्यंत उमेदवारांची मुलाखतीची प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर टॉप फाइव्ह उमेदवारांची निवड केली जाईल. राज्यपाल या पाच उमेदवारांची मुलाखत घेऊन त्यापैकी एका उमेदवाराची कुलगुरुपदी निवड करणार आहेत.