Pune Traffic Changes : पुण्यात मनोज जरांगे यांचा ताफा ‘या’ मार्गे जाणार, वाहतुकीत मोठा बदल, जाणून घ्या कशी असणार वाहतूक…


Pune Traffic Changes : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांचा अंतरवाली सराटी ते मुंबई मोर्चा २० जानेवारीला सुरू झाला. हा मोर्चा मंगळवारी सांयकाळी पुण्याच्या वेशीवर पोहोचला होता. आज सकाळी दहा वाजता वाघोलीतून दहा वाजता मोर्चाला सुरुवात झाली आहे.

पुण्यातून या मोर्चाचा मार्ग असू आज दुपारी पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीत मनोज जरांगे पाटील प्रवेश करत आहेत. मनोज जरांगेंच्या पदयात्रेमुळे पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आलेत. पदयात्रेचा मार्ग काय आहेत ते जाणून घ्या..

प्रवेश मार्ग पुढील प्रमाणे..

स्व. राजीव गांधी पुल औंध पुणे, सांगवी फाटा, जगताप डेअरी, डांगे चौक, चापेकर चौक चिंचवडगाव, महावीर चौक चिंचवड स्टेशन, आकुर्डी खंडोबा माळ चौक, निगडी मधुकर पवळे उड्डाणपूल, भक्ती शक्ती चौक निगडी, देहूरोड, तळेगाव, वडगाव फाटा मावळ, कामशेत, लोणावळा मुक्काम.

आज सकाळी ६ वाजल्यापासून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून करण्यात आलं आहे. मनोज जरांगेंचा मोर्चा जात असताना येथे अवजड वाहने ही पूर्णपणे बंद असणार आहेत. पदयात्रा जसजशी पुढं सरकेल तसतशी हे मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात येणार आहेत. Pune Traffic Changes

पर्यायी मार्ग जाणून घ्या…

मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरून, तसेच कोल्हापूर, सातारा येथून नगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने कात्रज खडी मशिन चौक, मंतरवाडी फाटा हडपसरमार्गे सोलापूर रोडने केडगाव चौफुला – न्हावरे- शिरूरमार्गे जातील.

तर वाघोली, लोणीकंदमार्गे नगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने थेऊर फाटा (सोलापूर रोड) येथून केडगाव चौफुला न्हावरामार्गे शिरूर ते अहमदनगर जातील.

यासह पुणे शहरातून नगरकडे जाणारी सर्व वाहने खराडी बायपास उजवीकडे वळण घेऊन मगरपट्टा चौक, पुढे सोलापूर रोडने यवत केडगाव चौफुला – न्हावरे -शिरूरमार्गे पुढे सोडण्यात येणार आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!