Pune To Ayodhya Bus : रामभक्तांसाठी आनंदाची बातमी! अयोध्येला आता पुण्यातून जाणार एसटी महामंडळाची बस, जाणून घ्या किती असेल तिकीट…


Pune To Ayodhya Bus : नुकतेच अयोध्येत प्रभू रामाचे प्राणप्रतिष्ठा सोहळा करण्यात आले. यानंतर सर्वसामान्य भक्तांसाठी हे मंदिर खुले करण्यात आले. प्रभू रामाच्या दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांची संख्या वाढत आहे. अशातच आता सर्व रामभक्तांसाठी खुशखबर आहे. आता पुण्यातून लालपरीने अयोध्येची पारी करता येणार आहे.

जानेवारी महिन्यात रामलल्लाची अयोध्यामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडले. राम मंदिराचंही लोकार्पण झाले. तेव्हापासुन भाविकांसाठी रामलल्लाचे दर्शन खुले झाले आहे. सर्व भाविकांना श्री रामप्रभूंच्या दर्शनाची आस आहे. सरकारने देखील भाविकांना रामलल्लाचं दर्शन घेता यावं म्हणून विशेष गाड्यांची सोय देखील केली होती.

भाविकांना प्रभू रामचंद्रांचे दर्शन घडवण्यासाठी एसटी हा विशेष उपक्रम राबवत आहे. पुणे जिल्ह्यातून भाविकांच्या मागणीनुसार या एसटी बस सोडल्या जाणार आहेत. जर ४५ ते ५५ जणांचा एक समूह एकत्र प्रवास करणार असेल, तर एसटी सोडली जाणार आहे. Pune To Ayodhya Bus

२४ एप्रिल रोजी राज्यातून पहिली गाडी अयोध्येला रवाना होणार आहे. भाविकांना प्रभू रामचंद्रांचे दर्शन घडवण्यासाठी पुण्यातून एसटी बस सोडण्यात येत आहेत. ५० जणांचा ग्रुप असेल तर सोयीनुसार आणि मागणीनुसार एसटीची पाहिजे ती गाडी भक्तांना मिळू शकणार आहे. त्यामुळे भाविकांना आता आपल्या लाडक्या रामप्रभूचं दर्शन घेणे सोपे झाले आहे.

५६ रुपये प्रतिकिलोमीटर भाडे…

तसेच अयोध्येला जाणाऱ्या भाविकांसाठी प्रती किलोमिटर ५६ रुपये भाडे आकारले जाणार आहे. या यात्रेत साधारण ३ ते ४ मुक्काम होण्याची शक्यता आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने प्रत्येक बससोबत २ ते ३ चालक देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रवासामध्ये भाविकांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाणार आहे. या बातमीमुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!