दुर्दैवी! पुण्यात पाणी भरण्यावरून झाला वाद, शेजारच्याने रागात पोटात मारली लाथ, महिलेच्या पोटातील बाळ…


पुणे : नळावर पाणी भरण्याच्या वादातून तीन जणांनी गर्भवती तरुणीला मारहाण केली. पोटावर मारहाण केल्याने रक्तस्राव होऊन तिचा गर्भपात झाला.

या प्रकरणी आरोपींवर लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघोलीतील गोरेवस्ती परिसरामध्ये हा प्रकार घडला.

रवी धोत्रे, शांताबाई धोत्रे या दोघांसह अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पंचवीस वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली येथील गोरेवस्ती परिसरामध्ये सार्वजनिक नळावर पाणी भरण्याच्या कारणावरून रवी आणि शांताबाई धोत्रे यांनी शिवीगाळ करून तरुणीला मारहाण केली.

अल्पवयीन मुलाने तिच्या पोटावर मारहाण केली. यामुळे रक्तस्राव होऊ लागल्याने तरुणीला त्वरित ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात तिचा गर्भपात झाला. यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!