Pune : मोठी बातमी! पिंपरीत पाण्याची टाकी कोसळून भयंकर दुर्घटना, ५ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी…
Pune : पिंपरी चिंचवडमधून मोठी बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पाण्याची टाकी कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. लेबर कॅम्पसाठी ही पाण्याची टाकी उभारण्यात आली होती.
यात पाच कामगारांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समजते. अद्याप मृतांची नावे समोर आलेली नाहीत. तर पाण्याची टाकी कोसळली त्याठिकाणी आणखी काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही घटना पिंपरी चिंचवड शहरातल्या सद्गुरु नगर इथं घडली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, पिंपरी चिंचवडमध्ये पाण्याची टाकी कोसळून दुर्घटना घडलीय. यात पाच जणांचा मृत्यू झालाय. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. लेबर कॅम्पसाठी उभारण्यात आलेली ही पाण्याची टाकी आहे. Pune
दरम्यान, महापालिका आयुक्त शेखर सिंग यांनी ही पाण्याची टाकी महापालिकेची नसल्याचं स्पष्ट केलं आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.