Pune Swargate Metro : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! गणेशोत्सवात मेट्रोची स्वारगेटपर्यंत धाव…
Pune Swargate Metro : पुणे मेट्रोची स्वारगेट्पर्यंत सेवा गणेशोत्सवाच्या आधी सुरु होण्याची शक्यता आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून जुलै अखेरीस ते पूर्ण होणार आहे.
त्यांनतर सप्टेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या आधी या मार्गावर मेट्रो सेवा सुरु करण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे.
शहरात मध्यवर्ती पेठांच्या भागात मानाचे गणपती आहेत.या गणपतीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मार्गावर मेट्रो सेवा सुरु झाल्यास भाविकांची मोठी सोय होणार आहे. Pune Swargate Metro
मध्यवर्ती भागात गर्दीमुळे भाविकांना वाहनाने जाणे शक्य होत नाही. अशाठिकाणी भाविक मेट्रोच्या साह्याने जाऊ शकणार आहेत. या मार्गाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. मार्गाचे काम जुलै अखेरीस पूर्ण करण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे.
जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मार्गावर बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट अशी तीन स्थानके असून हा मार्ग ३.६४ किमी चा आहे. या भुयारी मार्गावर मेट्रोची चाचणी फेब्रुवारीमध्ये घेण्यात आली आहे.
यातील जिल्हा न्यायालय स्थानक ते बुधवार पेठ स्थानक मार्ग मुळा नदीपात्राच्या खालून जातो. त्यामुळे शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच अशाप्रकारे नदीपात्राखालून मेट्रो धावणार आहे.
दरम्यान, जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो मार्गाचे काम ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. मार्गाचे काम जुलै अखेरीस पूर्ण करण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे. या मार्गावरील सेवा गणेशोत्सवाच्या आधी सुरु करण्याचा प्रयत्न असल्याचे महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ यांनी अशी माहिती दिली आहे.