पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टायर फुटल्याने भर उन्हात एसटी बस ठप्प, प्रवाशांना मोठा फटका…


इंदापूर : राज्यात अनेक लोक एसटीनेच प्रवास करतात. असे असताना मात्र बस बंद पडणे, टायर फुटणे हे प्रकार घडत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच सध्या एसटीची परिस्थिती बिकट आहे.

दरम्यान, आज पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुणे- लातूर– अहमदपूर ही राज्य परिवहन महामंडळाची बस दुपारी सव्वा बारा वाजता टायर फुटल्याने बंद पडली. ऐन उन्हात प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. यामुळे अनेकांचे हाल झाले.

यामुळे राज्य परिवहन मंडळाच्या बस पेक्षा खाजगी बसचा प्रवास चांगला, अशा प्रतिक्रिया प्रवाशांनी दिल्या. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना तिकिटामध्ये ५० टक्के सवलत दिल्याने अनेक महिला एसटी बस द्वारे प्रवास करत आहेत.

परंतु एसटी बस बंद पडत असल्याने उन्हाचा तडाखा बसत असून प्रवाशांना त्रास होत आहे. यामुळे प्रवासी संतप्त झाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!