पुणे हादरलं!! दोघे फिरायला गेले, पैशांवरून झाला वाद, प्रियकराने प्रियसीचे शीरच धडावेगळे केलं, कोयता घेऊन पोलीस स्टेशनला हजर झाला…

पुणे : पुणे जिल्ह्यातील प्रेमीयुगुलापैकी प्रेयसीने पैसे मागितल्याच्या रागातून प्रियकराने कोयत्यामे वार केला, त्यानंतर तिचे शीर धडावेगळे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. फिरण्यासाठी गेलेल्या जोडप्यामध्ये क्षुल्लक कारणास्तव वाद झाला, त्यानंतर चिडलेल्या प्रियकराने कोयत्याने वार केले.
या घटनेने सगळे हादरले आहेत. वांबोरी परिसरातील (ता. राहुरी) विळद रोडवरील पिलेश्वर देवस्थान परिसरात असलेल्या गणपती मंदिरात जवळ घडली आहे. सोनाली राजू जाधव (वय 28, रा. पोखरी, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे मृत महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे घटनेनंतर आरोपी स्वतः पोलीस स्टेशनला हजार झाला.
सखाराम धोंडिबा वालकोळी (वय 58, रा. निडगुरसर, ता. आंबेगाव, जि. पुणे) असं त्याचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, आरोपी सखाराम हा प्रेयसी सोनालीसोबत सायंकाळी सातच्या सुमारास वांबोरी परिसरातील पिलेश्वर देवस्थान परिसरात गेले होते. याबाबत कोणाला माहिती नव्हती.
पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावेळी प्रेयसी सोनाली आरोपी सखारामकडे पैशाची मागणी करू लागली. मला पैसे दे नाहीतर मी पोलिसात तक्रार करीन, असे ती म्हणात होती, त्यावरून सोनाली व सखाराम यांच्यात भांडण झाले. हा वाद इतका टोकाला गेला की, सखारामने सोनालीच्या मानेवर कोयत्याने वार केला. घटनेत तिचा मृत्यू झाला. जोरात कोयत्याने वार केल्याने सोनालीचे शीर धडावेगळे झाले. यामुळे एकच खळबळ उडाली.
रागाच्या भरात त्याने हे कृत्य केलं आहे. आरोपी सखाराम वार केलेला कोयता घेऊन जवळपास चार किलोमीटर अंतर चालत रात्री वांबोरी पोलिस दूरक्षेत्रात पोहोचला. तेथे त्याने स्वतःच फोन करून पोलिसांना बोलावून घेतले. मी माझी प्रेयसी सोनालीला ठार मारले आहे, असे त्याने पोलिसांना सांगितले. याबाबत पोलीस तपास करत आहेत.