पुणे हादरलं ; हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती, 25 वर्षीय विवाहितेने संपवलं जीवन…


पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वीच पुण्यातील वैष्णवी हगवणे या तरुण विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली होती. हे प्रकरण ताजे असतानाच पुण्यात आणखी एका नवविवाहित महिलेने सासरच्या छळाला कंटाळून आपला आयुष्य संपवलं असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, स्नेहा झेंडगे (मूळगाव – कर्देहळी, ता. दक्षिण सोलापूर) या २५ वर्षीय विवाहितेने पती व सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या सततच्या शारीरिक व मानसिक छळामुळे, तसेच कंपनी सुरू करण्यासाठी २० लाख रुपये देण्याच्या दबावामुळे, घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली.ही घटना ९ ऑगस्ट २०२५ रोजी घडली असून, याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पती, सासरे, सासू, दिर, नणंद, नणंदेचा पती आणि सासऱ्यांचे साडू अशा सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणी स्नेहाचा पती विशाल झेंडगे, सासरे संजय झेंडगे, सासू विठाबाई झेंडगे, दिर विनायक झेंडगे, नणंद तेजश्री थिटे, नणंदेचा पती परमेश्वर थिटे आणि सासऱ्यांचे साडू भाऊसाहेब कोल्हाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व आरोपींनीं स्नेहावर विवाहानंतर सतत अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणांन संतापाची लाट उसळली आहे.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!