पुणे रिंगरोडच्या कामाला मिळणार गती; आतापर्यंत ४५० कोटींचे झाले वाटत, शेतकऱ्यांनीही दिली संमती…


पुणे : पुण्यात सध्या भविष्याच्या दृष्टीने रिंगरोड वाढत आहेत. याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) सुरू केलेल्या वर्तुळाकार रस्त्याच्या भूसंपादनाला गती आली आहे.

यामध्ये आतापर्यंत ४५० कोटी रुपयांचे वाटप झाले असून, ६०२ कोटी शिल्लक आहेत. या रस्त्याचे नकाशांद्वारे जीएसआय मॅपिंग होणार आहे. रिंग रोडसाठीच्या भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाकडून बाधितांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.

स्वेच्छेने अगोदर येणार्‍या शेतकर्‍यांची निवड प्रक्रिया राबवून भूसंपादन करण्यात येत असल्याची माहिती रस्ते महामंडळाकडून देण्यात आली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते महामंडळाने १७२ किलोमीटर लांब आणि ११० मीटर रुंदीचा वर्तुळाकार रस्ता हाती घेण्यात आला आहे.

पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले आहेत. पश्चिम भागात भोरमधील पाच, हवेलीतील ११, मुळशीतील १५ आणि मावळातील सहा गावांचा समावेश आहेत. प्रकल्पासाठी ६९५ हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. हा एक मोठा प्रकल्प आहे.

त्यानुसार पश्चिम भागातील जमिनींच्या मूल्यांकनाची प्रक्रिया पार पडली आहे. दर निश्चित झाल्यानंतर भूसंपादन नोटीस पाठविण्यात आल्या. मात्र, काही स्थानिक संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मूल्यांकन प्रक्रियेत तफावत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या.

त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी संबंधित गावकर्‍यांच्या मागण्या पाहून प्रांतनिहाय चौकशीचे आदेश देत नोटिशींबाबत मुदतवाढीचा निर्णय दिल्याने शेतकर्‍यांनी भूसंपादनाला सहमती दर्शवली आहे.

यामुळे आता पुढील कामे देखील लवकरच पूर्ण होतील. तसेच रोडची कामे देखील लवकरच सुरू होतील. यामुळे विकासाला गती मिळेल. यामध्ये आता शेतकऱ्यांची भूमिका महत्वाची आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!