पुणे रेव्ह पार्टी प्रकरण ; खडसेंच्या जावयाचा धक्कादायक दावा, म्हणाले…..

पुणे : पुण्यातील रेव्ह पार्टीच्या प्रकरणात माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक करण्यात आली आहे. आता त्यांना न्यायालयापुढे हजर करण्यात आलं आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून खेवलकर यांनी न्यायालयात मी अमली पदार्थाचं सेवन केलंच नाही असा दावा केला आहे.
माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर खराडी येथील रेव्ह पार्टी प्रकरणी अटकेत आहेत. त्यांना पुणे पोलिसांनी आज न्यायालयात हजर केलं. या रेव्ह पार्टी प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी प्रांजल खेवलकर यांना पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी केली आहे. तर खेवलकर यांना कोठडी सुनावण्याची आवश्यकता नाही, असं मत त्यांच्या वकिलांनी मांडलं आहे. त्याचबरोबर राजकीय द्वेष आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करण्यासाठी यंत्रणांचा वापर केला जातोय, असा दावाही खेवलकर यांनी आपल्या वकिलांच्या माध्यमातून केला आहे.
पोलिसांनी सगळा ट्रॅप लावला आहे,पोलीस कोठडी कशासाठी हवी त्याची गरज नाही असं त्यांनी वकिलांच्या माध्यमातून म्हटल आहे.पोलिसांनी जर रक्त चाचणीचा रिपोर्ट बदलला नाहीतर त्यामध्ये कोणत्याही प्रकारची नशा केलेली दिसणार नाही, असं खेवलकर यांनी म्हटलं आहे.