Pune Porsche Car Accident : पुणे पोलिसांची मोठी कारवाई, ससून ब्लड रिपोर्ट फेरफारप्रकरणी आमदाराच्या दोन कार्यकर्त्यांना अटक…


Pune Porsche Car Accident : ससून ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. अश्फाक मकानदार आणि अमर गायकवाड यांना 10 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोर्शे कार अपघात प्रकरणात पोलिसांनी आणखी दोन जणांना अटक केली आहे. अल्पवयीन आरोपीला मदत केल्याचा आरोप त्यांंच्यावर आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी अल्पवयीन मुलाचे रक्त न घेता आईचे रक्त घेऊन मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आशपाक बाशा मकानदार आणि अमर संतोष गायकवाड असं अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींचं नाव आहे. Pune Porsche Car Accident

डॉ अजय तावरेच्या माध्यमातून श्रीहरी हरनोळ, अतुल कांबळे यांच्यासोबत अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी आर्थिक देवाणघेवाण केली, रक्ताचे नमुने चुकीचे देण्यासाठी आर्थिक देवाणघेवाण करण्यात आली, आरोपीला वाचवण्यासाठी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न असा आरोप अटक करण्यात आलेल्या या दोघांवर आहे. त्या दोघांना दहा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ब्लड रिपोर्ट फेरफार करण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांना या दोघांनी तीन लाख रुपये दिले होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुंबईतून या दोघांना अटक केली. अटक केलेले दोन्ही कार्यकर्ते हे एका आमदाराशी संबधित असल्याची माहिती समोर येत आहे.

अश्पाक मकानदार हा एका आमदाराचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर ते पोलिस ठाण्यातही हजर होते. आमदाराच्या निकटवर्तीय कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!