आयुष कोमकर हत्याप्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई ; थेट गुजरात कनेक्शन?आणखीन चौघांच्या आवळल्या मुसक्या..


पुणे : पुण्यातील नानापेठेत झालेल्या टोळीयुद्ध आणि कौटुंबिक वादातून उगम पावलेल्या आयुष कोमकर खून प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी थेट गुजरात गाठत आंदेकर कुटुंबातील आणखी चार जणांच्या मुसक्या आवळल्याची माहिती आहे. गुजरातमधून या चौघांना अटक करण्यात आली आहे. शिवम आंदेकर, शिवराज आंदेकर, अभिषेक आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर अशा चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

आयुष उर्फ गोविंदा कोमकर हा अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. विशेष म्हणजे तो बंडू आंदेकरचा नातु असल्याची माहिती समोर आली.माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याचा खून घडवून आल्याचा तपासात स्पष्ट झाले. याप्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत गुजरात मधून चौघांना अटक केली आहे.

या हत्येप्रकरणी पोलिसांनी आंदेकर टोळीचा मुख्य बंडूअण्णा राणोजी आंदेकर (वय 64), तुषार वाडेकर (वय 24), स्वराज वाडेकर (वय 21), वृंदावनी वाडेकर (वय 40), तसेच अमन युसूफ पठाण उर्फ खान (वय 22, सर्व राहणार नानापेठ), सुजल मेरगू (वय 23) यांना बुलढाणा परिसरातून अटक करण्यात आली होती. तर अमित पाटोळे (वय 19), यश पाटील (वय 19) या दोघांना पोलिसांनी हत्येच्या दुसऱ्या दिवशी ताब्यात घेतलं होतं. अमन पठाण आणि यश पाटील याच दोघांनी आयुषवर गोळ्या झाडत त्याला संपवलं होतं. आता त्यानंतर चौघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!