पुणे पोलिसांची दबंग कारवाई, एका रात्रीत 521 जणांना अटक…!


पुणे : निवडणुकांच्या पार्र्शवभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. यात आता चोवीस तास काम करणाऱ्या पोलिसांच्या कामात अजूनच भर पडली आहे. निवडणूका म्हणलं कि खिसे भरूंची टोळी तयार होते. यातून मग धमकावणे आचारसंहितेचे उल्लंघन करणे असे प्रकार निवडणुकांना काळिमा फासणारे असतात. पुणे पोलिसांनी कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठी कारवाई केली असून 521 जणांना अटक केली आहे.

पोलीस आयुक्त रितेशकुमार कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पोलिसांनी बुधवारी विशेष मोहीम राबविली आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या भागात कारवाई करून 3 हजार 707 गुन्हेगारांची झाडाझडती घेतली आहे. यावेळी गंभीर गुन्ह्यातील तब्बल 521 जणांना अटक करण्यात आली आहे. महाशिवरात्र ,शिवजयंती तसेच कसबा पोटनिवडणुकीच्या धर्तीवर या धडक कारवाई करण्यात आली आहे.

पुणे पोलिसांनी बुधवारी रात्री ९ ते मध्यरात्री दोन वाजेपर्यंत शहरातील, 544 हॉटेल, लॉजसह पीएमपी बसथांबे, रेल्वेस्थानक, एसटी स्थानक परिसरात तपासणी मोहीम राबवली. यावेळी अनेक ठिकाणी नाकाबंदी करून एक हजार 485 वाहनचालकांची चौकशी करण्यात आली. तसेच 538 गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. कारागृहातून जामीन मिळवून बाहेर पडलेल्या आरोपींनी पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत.

पुणे पोलीस दलाच्या पथकाने तपासणी मोहीम राबवली. गंभीर गुन्ह्यातील 521 गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. तसेच बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून शस्रसाठा जप्त करण्यात आला. अमली पदार्थ विरोधी पथकाने टांझानियातील एकाकडून 23 लाख 26 हजारांचे कोकेन जप्त केले आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने मुंढव्यातील एका हुक्का पार्लरवर छापा टाकला आहे.

अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे, रंजनकुमार शर्मा, रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, संदीपसिंह गिल, स्मार्तना पाटील, सुहेल शर्मा नारायण शिरगावकर आदींच्या पथकाने कारवाई केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!