Pune News : पुणे हादरले! कोयत्याने वार करुन २१ वर्षाच्या तरुणाचा खून, घटनेने उडाली खळबळ, नेमकं घडलं काय?
Pune News : पुणे शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. येरवड्यातील ब्रह्मा सनसिटी परिसरात एका २१ वर्षाच्या तरुणाचा कोयत्याने सपासप वार करुन खून केल्याची घटना बुधवारी (ता.१) रात्री दहाच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
अभिषेक राठोड असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, बुधवारी रात्री दहाच्या सुमारास ब्रह्मा सनसिटी परिसरात अभिषेक राठोड याच्यावर अज्ञातांनी कोयत्याने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अभिषेकचा जागीच मृत्यू झाला. Pune News
खूनाच्या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळाला भेट दिली.
अभिषेकचा खून कोणी आणि कोणत्या कारणाने केला याची अद्याप माहिती मिळू शकली नाही. याप्रकरणी रात्री उशिरा अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलीस अधिक तपास करत असून सीसीटीव्ही फुटेजच्याद्वारे आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती आहे.