Pune News : पुण्यात रिंगरोडसाठी ३१ गावातील भूसंपादन सक्तीने होणार, जिल्हास्तरीय समितीची मान्यता..

Pune News पुणे : रिंगरोडसाठी रस्त्यातील पश्चिम भागातील गावांचे भूसंपादन सुरू आहे. आधी मावळ, मुळशी आणि हवेली तालुक्यातील ३१ गावांमधील जमिनींचे सक्तीने भूसंपादन करण्याचे यापूर्वीच निश्चित झाले असून, पश्चिम भागातील ३१ गावांचे सक्तीने भूसंपादन करण्यास जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिली. Pune News
तसेच शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते महामंडळाने १७२ किलोमीटर लांबी आणि ११० मीटर रुंदीच्या वर्तुळाकार रस्त्याचे काम हाती घेत पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागांत भूसंपादन करण्याचे निश्चित केले.
त्यामध्ये पूर्वभागात मावळातील ११, खेडमधील १२, हवेलीतील १५, पुरंदरमधील पाच आणि भोरमधील तीन गावांचा समावेश आहे, तर पश्चिम भागात भोरमधील पाच, हवेलीतील ११, मुळशीतील १५ आणि मावळातील सहा गावांचा समावेश आहे.
मावळ, मुळशी आणि हवेली तालुक्यांतील ३१ गावांतील स्थानिकांनी संमतीपत्र दिलेले नाही. भूसंपादनासाठी आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या स्थानिकांनी संमतीपत्र दिलेले नाही, त्यांना अंतिम नोटीस पाठवून सक्तीने भूसंपादन करण्यात येईल.