Pune News : पुणे शहरात अग्नितांडव, येरवड्यात लाकडी साहित्याचं गोदाम जळून खाक, तर, वाघोलीत गोदामाला भीषण आग..
Pune News : पुणे शहरात भीषण अग्नितांडव पाहायला मिळालं आहे. येरवड्यात लाकडी साहित्याच्या गोदामाला भीषण आग लागली, तर पुण्यात वाघोलीत वाहनांचे स्पेअर पार्ट असलेल्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली आहे. या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
पुण्यात वाघोलीत वाहनांचे स्पेअर पार्ट असलेल्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. वाघोलीतील गाडे वस्ती परिसरात वाहनांचे जुने स्पेअर पार्ट असलेल्या स्क्रॅप गोदामाला आग लागली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.
येरवड्यात लाकडी साहित्याच्या गोडाऊनला भीषण आग…
येरवड्यात लाकडी साहित्याच्या गोडाऊनला भीषण आग लागली होती. आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास येरवड्यात बालाजीनगर येथे लाकडी साहित्याच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमनदलाच्या पाच गाड्या दाखल झालेल्या आहेत.
या आगीत गोडाऊनमधील लाकडी साहित्य संपूर्ण पेटले आहे. गोडाऊनमध्ये असणाऱ्या इतर साहित्याचं देखील संपूर्ण नुकसान झालेलं आहे. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. आग विझवण्याचे काम सुरू आहे.