Pune News : चहाची तलफ तरुणाच्या जीवावर बेतली, घोट घेताच क्षणात सगळं संपलं, पुण्यात काय घडलं?
Pune News : झाडाखाली चहा पीत उभ्या असलेल्या एका तरुणाच्या डोक्यावर अचानक झाडाची फांदी कोसळली. या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्देवी घटना पुणे शहरातील ओंकारेश्वर मंदिर परिसरात रविवारी (ता.२६) सायंकाळच्या सुमारास घडली आहे.
अभिजित गुंड (वय. ३२, रा. कसबा पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. Pune News
मिळालेल्या माहितीनुसार, अभिजित गुंड हा तरुण रविवारी सायंकाळी चहा पिण्यासाठी ओंकारेश्वर मंदिर परिसराखाली असलेल्या टपरीवर आला होता. चहा घेताना तो मित्रांसोबत निवांत गप्पा मारत होता. त्यावेळीच झाडावरून अचानक वाळलेली फांदी कोसळली.
ही फांदी अभिजित याच्या डोक्यावर पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. याचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.