Pune News : पुणेकरांसाठी गुड न्यूज! हडपसर रेल्वे टर्मिनलसाठी पीएमपी बस सुरू, प्रवाशांना होणार फायदा..

Pune News : पुणे : गेल्या काही दिवसांपासून हडपसर रेल्वे टर्मिनलसाठी पीएमपी बस सुरू करण्याची मागणी केली जात होती. आता प्रशासनाच्या वतीने आजपासून शुक्रवार (ता.२२) पासून बससेवा सुरू करण्यात येणार आहे. Pune News
यामुळे रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. प्रवाशांची संख्या कमी आहे, त्यामुळे पीएमपीला परवडत नाही, असे सांगत पीएमपी प्रशासनाने हडपसर रेल्वे टर्मिनल येथील बससेवा बंद केली होती. याचा फटका अनेकांना बसत होता.
हैदराबाद एक्सप्रेस आणि इतर पॅसेंजर गाड्यांचे सुमारे ९०० प्रवासी दररोज हडपसर स्थानकावरून ये-जा करतात. बस बंद केल्याने त्यांचे मोठे हाल होत होते. यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात होती.
हडपसर गाडीतळ ते हडपसर रेल्वे स्थानकादरम्यान ही बस धावेल. त्यासोबतच येथील मुंढवा चौक ते केसनंद फाटा (वाघोली) या मार्गावरसुद्धा आजपासून बस सेवा सुरू होणार आहे.
ही सेवा दर तासाला असेल. टर्मिनलवरील सेवा रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकानुसार असेल. यामुळे आता प्रवाशांना दिलासा मिळणार असून वेळ देखील वाचणार आहे.