Pune News : पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? समोस्यात कंडोम आता बर्फात मेलेला उंदीर….


Pune News : पुण्यात पिंपरी-चिंचवड येथे समोशात कंडोम आणि दगड आढळला होता. ही घटना ताजी असतांना आता बर्फाच्या लादीत मेलेला उंदीर आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुणेकरांच्या जीवाशी खेळ सुरुये का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

सूर्य दिवसेंदिवस आग ओखतोय, यामुळं अंगाची लाहीलाही होतेय. या उकड्यापासून सुटका मिळवण्यासाठी अनेक जण विविध शीतपेयांना पसंती देत आहेत. यात तुम्ही बर्फमिश्रीत पदार्थांना पसंती देत असाल तर तुमचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. हे अधोरेखित करणारी बाब पुण्यात घडली आहे.

इथं बर्फातचे मृतावस्थेत उंदीर आढळलं आहे. जुन्नर तालुक्यात ही घटना समोर आली आहे. एकाचवेळी मोठ्या प्रमाणात बर्फ तयार केला जातो. हे बर्फ ऊसाचे गुऱ्हाळ, सरबत, गोळा यांसह अनेक शीतपेयांसाठी वापरात आलं असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं अनेकांच्या आरोग्याला धोका उद्भवू शकतो.

बर्फाचा दर्जा हा मुद्दा कायमचं ऐरणीवर असतो, त्यावर शिक्कामोर्तब करणारी ही घटना पुन्हा एकदा समोर आल्यानं अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. निघोज येथील एका आईस फॅक्टरीमधून हा बर्फ विक्रीसाठी येतो. हा बर्फ जिथे साठवणूक केली जाते तिथे आल्याला दावा विक्रेत्यांनी केला आहे. उंदीर आढळल्यानंतर बर्फ फेकून देण्यात आला आहे, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. Pune News

दरम्यान, यंदा अत्यंत कडक उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे आपसूकच बर्फाची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. अशा वेळी दूषीत बर्फाचा पुरवठा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अस्वच्छ ठिकाणी बर्फाचा साठा करून ठेवण्यात येतो. तसेच तयारही करण्यात येत असल्याचे अनेक ठिकाणचे चित्र दरवर्षीच्या उन्हाळ्यातील आहे आहे.

खात असलेला बर्फ दूषित आहे की चांगला हे मात्र सर्वसामान्यांना कळत नाही. कायद्याचे उल्लंघन करून नफा कमवण्यासाठी मानवी आरोग्याला धोका होईल, याचा कोणताही विचार न करता बर्फ तयार केला जात असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!