Pune News : जेजुरीत मोठा अपघात, घरावर पॅराग्लायडिंग कोसळून तरुणी जखमी….

Pune News : पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आज सायंकाळी पॅराग्लायडिंग एका घरावर कोसळल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत पुण्यातील सतरा वर्षीय तरुणी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
आस्था प्रदीप माने असे जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे. या तरुणीला खाजगी रुग्णालयात दाखल केलं असून उपचार सुरू आहेत.
पॅराग्लायडिंग साइटवरून उड्डाण करताच चालकाचे पॅराग्लायडरवरील नियंत्रण सुटल्याची ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये आस्था जखमी झाली. त्यानंतर तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहे. Pune News
तसेच यावेळी पॅराग्लायडिंग करणारा चालकाला सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही. पोलिस घटनास्थळावर पोहोचले असून प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी बीडमध्ये देखील अशीच घटना घडली होती. बीडमधील वैजनाथ येथे पॅराग्लायडिंग करताना महिला पायलटचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे आता अपघातातून वाचण्यासाठी नियमावली कधी लागू होणार? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.