Pune News : आज तुला संपवतोच मी येरावड्याचा भाई आहे…; पुण्यात धमकी देऊन ठार मारण्याचा प्रयत्न, एकाला अटक..

Pune News पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत. Pune News
सध्या अशीच घटना समोर आली आहे. ‘मी येरवड्याचा भाई आहे, तुला तर आज संपवूनच टाकतो असे सांगत चोवीस वर्षीय तरुणावर धारदार हत्याराने डोक्यावर वार करीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी एकाला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. Pune News
समीर मकरंद सावंत (वय २२ रा.सुभाषनगर येरवडा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अमेय जगताप (वय. २४ रा सुभाषनगर नवी खडकी येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना (ता.१८)रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता नवी खडकी मधील नेताजी शाळेजवळील किराणा दुकानासमोर घडली.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी हे नेताजी शाळेजवळील किराणा दुकानात किराणा सामान आणण्यासाठी गेले असताना त्यांच्याच परिसरात राहाणा-या आरोपीने शिवीगाळ व धक्काबुक्की करुन इथे थांबायचे नाही, मी बोलतो ना , तर ऐकायचे, फिर्यादी याने विचारणा केल्याचा राग मनात धरुन, तू मला उलटे बोलतो का, तुला माहिती नाही का मी येरवड्याचा भाई आहे.
तुला तर आज संपवूनच टाकतो असे बोलून त्याच्याकडील धारदार हत्याराने फिर्यादीस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तसेच त्याच्याकडील हत्यार हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अन्सार शेख करीत आहेत.