Pune News : चाकण शिक्रापूर रोडवर गॅस टँकरचा स्फोट, घरांना भेगा, परिसरात भीतीचे वातावरण…
Pune News : पुण्यातील चाकण-शिक्रापूर मार्गावर गँस वाहून नेणाऱ्या टँकरचा भीषण स्फोट झाला आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. मात्र, घरांची पडझड झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
या स्फोटामुळे एक किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला असून अनेक घरांची पडझड झाली आहे. ही घटना मोहितेवाडी परिसरात आज रविवारी पहाटेच्या सुमारास घडली.
सविस्तर माहिती मोहितेवाडी परिसरात एक ढाबा आहे. या ढाब्यावर जेवणासाठी नेहमीच नागरकांची वाहनांची वर्दळ असते. रविवारी पहाटे या ढाब्यासमोर एक गॅस टँकर उभा होता. क्षणार्धात गॅस टँकरचा भीषण स्फोट झाला. Pune News
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. आग नियंत्रणात आणली. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, स्फोटात कानठळ्या बसणारा आवाज झाल्याने नागरिक चांगलेच धास्तावले. सध्या पोलिसांकडून घटनेचा तपास केला जात आहे