Pune News : पुणे हादरलं! माजी नगरसेविकेवर वारंवार बलात्कार, १० लाखही उकळले…
Pune News पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी वाढली असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. मैत्रीपूर्ण संबंधातून काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पुण्यात माजी नगरसेविका बलात्कार करण्यात आला आहे. Pune News
याप्रकरणी पर्वती पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. सचिन मच्छिंद्र काकडे ( वय ४३, रा. संतोषनगर, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी आणि पीडित माजी नगरसेविकेचे मैत्रीपू्र्ण संबंध होते. याच मैत्रीचा फायदा घेत सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. इतकंच नाही, तुझ्या पतीला फोटो दाखवेल, अशी धमकी दे आरोपीने पीडित महिलेवर वारंवार बलात्कार केला.
दरम्यान, २०१७ पासून हा प्रकार सुरू होता. यादरम्यान आरोपीने पीडितेला धमकावून १० लाख रुपये उकळल्याची धक्कादायक माहिती देखील पोलीस तपासात समोर आली आहे.
आरोपीकडून वारंवार होणाऱ्या लैंगिक शोषणाला कंटाळून पीडित नगरसेविकेने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सचिन याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक देखील केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.