Pune News : दिव्यांग मुलाने उचलले टोकाचे पाऊल, व्यायामासाठी घराबाहेर पडला अन्…,पुण्यातील धक्कादायक घटना

Pune News : व्यायामासाठी घराबाहेर पडलेल्या तरुणाचा विहिरीमध्ये मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातल्या डोंगरगाव येथील आहे.
गौरव भाऊसाहेब भोरडे असे (वय. १९ वर्षीय) असे या दिव्यांग तरुणाचे नाव आहे.
सविस्तर माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील डोंगरगावमध्ये तो आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता. गौरव दररोज व्यायाम करण्यासाठी घराबाहेर जायचा. शनिवारी सायंकाळी तो व्यायामासाठी बाहेर पडला खरा मात्र रात्र होऊन सुद्धा तो घरी आला नाही.
त्यामुळे त्याच्या घरच्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याचा मोबाईल ही बंद होता. कुटुंबीयांनी लोणीकंद पोलिस ठाण्यामध्ये गौरव हरविल्याची तक्रार दिली. गौरवचे कुटुंबीय आणि पोलिसांनी त्याचा शोध घेतला. पण तो कुठेस भेटला नाही. Pune News
शेवटची दोन दिवसांनंतर त्याचा मृतदेह बुर्केगाव येथील एका विहिरीत आढळून आला. त्याचा बुडून मृत्यू झाल्याने अनेक तर्क वितर्क व्यक्त करण्यात आले. मात्र पोलिसांनी तपास केला असता त्याने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गौरवच्या मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे