Pune News : पत्नीसोबतचा वाद गेला पोलीस स्टेशनमध्ये, तरुणाने पोलीस चौकीसमोर केलं भयंकर कृत्य, पुण्यातील घटना…
Pune News पुणे : पती-पत्नीच्या वादातून तरुणाने पोलिस चौकीसमोर येऊन ब्लेडने वार करून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी (ता.२३) फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शुक्रवार पेठ पोलिस चौकीसमोर घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
सलमान अत्तार, असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, सलमानची दोन लग्नं झाली असून, त्याच्यासोबत एकच पत्नी राहते. दारू पिल्यानंतर त्याने तिलाही मारहाण केली होती. त्याच रागातून पत्नी गणेश पेठेत माहेरी निघून गेली. मात्र, पत्नी मीसिंग असल्याची तक्रार घेऊन सलमान पोलिस चौकीत गेला. Pune News
तिथे पोलिसांनी त्याच्या पत्नीला फोन लावला असता, तिने माहेरी गेल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्याला घरी जायला सांगितले. त्याच रागातून त्याने शुक्रवार पेठ पोलिस चौकीसमोर स्वतःवर ब्लेडने वार आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.