Pune News : पुण्यात ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यासोबत घडली भयंकर घटना, मेंदूत रक्तस्त्राव झाला अन्…
Pune News : पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा मेंदूत रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाला आहे. कर्तव्य बजावत असताना दोन दिवसांपूर्वी त्यांना अस्वस्थ वाटल्याने पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
बाबुराव राठोड असं सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. ते ५० वर्षांचे होते.
बाबुराव राठोड हे गेल्या काही वर्षांपासून पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चाकण पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. Pune News
त्यांना दोन दिवसांपूर्वी कर्तव्य बजावत असताना अस्वस्थ वाटल्याने घरी पाठवण्यात आले, प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना पुण्यातील नामांकित रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांच्यावर उपचार सुरू असताना काल (बुधवारी) सकाळी त्यांचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याआधी देखील राठोड यांना ब्रेन हम्रेजमुळे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. ते ड्युटीवर असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
राठोड यांना याआधीदेखील ब्रेन हमरेजमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी ते रात्री ऑन ड्युटी असताना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.