Pune News : पुण्यात गणपती मिरवणुकीत माणुसकीचे दर्शन, ढोलताशा थांबवून रुग्णवाहिकेला करून दिली वाट…


Pune News पुणे : गेल्या दहा दिवसांपासून घराघरात गणरायाची भक्तीभावाने पूजा होत होती. तसेच अनंत चतुदर्शीला म्हणजेच आज गणरायाचे विसर्जन होणार आहे. यावेळी पुण्यात गणपती मिरवणुकीत माणुसकीचे दर्शन झाल्याचे चित्र पाह्यला मिळाले. (Pune News)

बेलबाग चौकामध्ये गणपती विसर्जन मिरवणुकी इतर ढोल-ताशा पथकांप्रमाणे ढोल ताशा पथकाची ताल सुरु होता आणि त्याच्या तालावर तरुणाई थरकत होती. मात्र बेलबाग चौकात अ‍ॅम्ब्युलन्स आली आणि अ‍ॅम्ब्युलन्सला वाट करुन देण्याचे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले.

अ‍ॅम्ब्युलन्सच्या सायरनचा आवाज येताच हजारो पुणेकरांनी बाजूला होऊन रस्ता करुन दिला. अ‍ॅम्ब्युलन्सला वाट करुन देण्यासाठी ढोल ताशा पथकाने आपले वादन थांबवले. कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि पोलिसांच्या मदतीने हजारोंची गर्दी दोन भागात विभागली गेली. आणि काहीवेळात मधल्या रस्त्याने अ‍ॅम्ब्युलन्स कोणत्याही अडथळ्याविना निघून गेली. यानंतर पुन्हा त्याच उत्साहात मिरवणुकीला सुरुवात झाली.

एका इमारतीच्या छतावरुन या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीचे शूटिंग करत असताना ही दृष्य कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत. गडबड गोंधळ, ढकलाढकली, चेंगराचेंगरी न करता पुणेकरांनी अ‍ॅम्ब्युलन्सला गर्दीतून वाट काढून दिली. त्यामुळे अ‍ॅम्ब्युलन्स कोणत्याही अडथळ्याविना पुढे निघून गेली. या व्हिडिओची चर्चा सध्या पुणेकरांमध्ये सुरु आहे.

तसेच नऊ दिवस सुरू असलेल्या गणेशोत्वाची गुरुवारी (ता. २८) सांगता होणार असून गणरायाला वैभवशाली मिरवणुकीने निरोप देण्यासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. सकाळी १०.३० वाजता महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून मुख्य विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. २८ तारखेला जवळपास २००० सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतीचे विसर्जन होईल.

दरम्यान, यावेळी विसर्जन मिरवणुकीसाठी ९ हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा बंदोबस्त असणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लक्ष मिरवणूक मार्गावर असणार आहे, अशी माहिती पुणे पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!