Pune News : पिस्तुल बेकायदेशीर, चुकुन झाडली गोळी, मित्राच्या मानेत गोळी गेली अन्.. , हवेली तालुक्यातील घटनेने उडाली खळबळ..


Pune News पुणे : बेकायदेशीरपणे गावठी पिस्तुल मिळवून मित्राला दाखवत असताना, त्याचा चाप ओढला गेल्याने गोळी सुटून ती मित्राच्या मानेत घुसली. त्यात मित्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर एका खासगी रुग्णलयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

या घटनेत अभय छबन वाईकर (वय २२, रा. सांगरुण, ता. हवेली) असे जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे. त्याच्यावर दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे.

याप्रकरणी पोलीस हवालदार आनंद रोहिदास घोलप यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी जखमी अभय वाईकर व अविष्कार ऊर्फ मोन्या तुकाराम धनवडे (वय १९, रा. सांगरुण, ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, अभय वाईकर व अविष्कार धनवडे हे दोघेही काही काम धंदा करत नाही. सांगरुण गावातील गणपती मंदिरात बुधवारी रात्री दहा वाजता ते जमले होते. अभय वाईकर याने एक गावठी पिस्तुल मिळविले. ते त्याने अविष्कार याला दाखवत त्यांच्यावर शायनिंग मारण्याचा प्रयत्न केला.

अविष्कार याने ते पिस्तुल त्याच्याकडून घेऊन पहात असताना अचानक त्याच्याकडून पिस्तुलाचा चाप ओढला गेला व गोळी सुटून ती अभय याच्या मानेत घुसली. त्याला तातडीने दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याने त्याचा जीव वाचला असून सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!