Pune News : अश्लील व्हिडिओ पाठवून अल्पवयीन मुलावर केले ‘हे’ कृत्य, सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल, पुण्यातील धक्कादायक घटना..

Pune News : अश्लील व्हिडिओ पाठवून एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सोसायटीच्या सुरक्षा रक्षकावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पीडित १६ वर्षाच्या मुलाने बुधवारी (ता.२०) कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन उमेश तिवारी (वय. ३० रा. काकडे वस्ती, कोंढवा बु.) याच्यावरगुन्हा दाखल केला आहे. Pune News
मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी तिवारी हा पीडित मुलगा राहत असलेल्या सोसायटीचा वॉचमन आहे. त्याने पीडित मुलाला वेळोवेळी व्हॉट्सॲपवर अश्लील व्हिडिओ पाठवले. त्यानंतर मुलाला सोसायटीच्या वॉशरुममध्ये घेऊ गेला. त्याठिकाणी मुलासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी मुलाने त्याला नकार दिला असता आरोपीने अश्लील चाळे करुन जबरदस्तीने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. मुलाने याबाबत घरच्यांना सांगतले असता घरच्यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी आरोपीवर बाललैंगिक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.