Pune News : कात्रज तलावात २३ वर्षीय तरुणीची उडी मारुन आत्महत्या, मध्यरात्री तलावाजवळ आला अन्….; प्रकरणाचा तपास सुरू..

Pune News : कात्रज तलावात तरुणीने उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधमोहीम राबवुन तलावात बुडालेल्या तरुणीचा मृतदेह बाहेर काढाला.

घटनास्थळी भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांकडून मृत तरुणीची ओळख पटवण्यात येत आहे. मृत तरुणी अंदाचे २३ वर्षाची असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांनी दिली आहे.
याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शनिवारी मध्यरात्री एका तरुणीने कात्रज येथील नानासाहेब पेशवे तलावात उडी मारल्याची माहिती पुणे अग्निशमन दलाला मिळाली होती. त्यानंतर जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी देखील घटनास्थळाला भेट दिली. Pune News

मात्र, अंधार झाल्याने जवानांनी शोधमोहीम थांबविली होती. त्यानंतर रविवारी पुन्हा शोधमोहीम राबवण्यात आली. जवानांनी बोटीतून पहणी केली असता तरुणीचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले.
मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला. आत्महत्या करणाऱ्या तरुणीची ओळख पटलेली नाही. पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.