Pune : पुणे महापालिकेचा अनधिकृत हॉटेल्स, पब्ज, रेस्टॉरंटला दणका! कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, मुंढवा, विमाननगरमधील मोठ्या ४० आस्थापनांवर कारवाई…
Pune : पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने सध्या एक मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये बेकायदेशीरपणे चालविल्या जाणार्या रुफटॉप आणि साईड मार्जिन मधील रेस्टॉरंट, बार, पबच्या विरोधात त्यांनी हातोडा चालविण्यास सुरुवात केली आहे.
यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. एकाच दिवसांत मुंढवा, कोरेगाव पार्क, कल्याणीनगर घोरपडी, पुणे स्टेशन आणि विमाननगर परिसरात स्वतंत्र पथके तयार करून मुंढवा भागातील हॉटेल, पब आदींचे अनधिकृत शेड काढण्यात आली आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तब्बल चाळीस ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत ५४ हजार ३०० चौ.फूट अनधिकृत बांधकाम हटवण्यात आली आहेत. अनेक हॉटेल्स व पब्जवर पुर्वीही कारवाई करण्यात आली होती. यानंतरही पुन्हा अनधिकृत शेडस् उभारल्याने कारवाई केली आहे.
तसेच संबधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, कल्याणीनगर येथील दुर्घटनेनंतर आता महापालिकेच्या बांधकाम विभागाने संबंधित हॉटेल आणि पबच्या बांधकामाचे सर्वेक्षण सुरु केले आहे. आता सगळ्यांची कडक तपासणी करण्यात येणार आहे. मंजुर नकाशापेक्षा अनधिकृत बांधकाम केले गेले आहे, त्याठिकाणी कारवाई केली जाणार आहे. Pune
दरम्यान, कल्याणीनगर आदी भागात चाळीस ठिकाणी अनधिकृत शेड उभ्या केल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. यानुसार बांधकाम विभागाने कारवाई सुरु केल्याची माहीती मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली. यामुळे अनेकांनी आपलं गबाळ गुंडाळून घेतलं आहे.