Pune Metro : अखेर ठरलं! आता या तारखेला पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार पुणे मेट्रोचं लोकार्पण…


Pune Metro : पुण्याच्या पावसामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा रद्द केला गेला होता. आता पुणे मेट्रोच्या लोकार्पणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 29 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हीसीच्या माध्यमातून पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मार्गाचं लोकार्पण करतील.

याचसोबत स्वारगेट कात्रज मेट्रो मार्गाचं भूमिपूजनही पंतप्रधान मोदींच्या हस्ते होईल. दरम्यान पुण्यातील एका प्रकल्पाचं आज मोदींच्या हस्ते व्हीसीमार्फतच उद्घाटन केलं गेलं. भारतीय उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेतील कार्यक्रमाला पंतप्रधान मोदींनी ऑनलाईन उपस्थिती लावली.

पंतप्रधानांच्या हस्ते अर्क आणि अरुणीका या प्रणालीचे उद्घाटन केले गेले. हवामान आणि हवामानाबाबत संशोधनासाठी बनवण्यात आलेल्या हाय-परफॉर्मन्स कम्प्युटिंगप्रणालीचंही पंतप्रधानांकडून ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन केले गेले. या प्रकल्पासाठी ८५० कोटी रुपये इतकी गुंतवणूक करण्यात आली आहे. Pune Metro

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते २९ सप्टेंबरला जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या भूमिगत मार्गाचं उद्घाटन तसेच स्वारगेट – कात्रज या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन होईल.

याचसोबत पंतप्रधान मोदी क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले स्मारक भिडे वाडा येथे पहिल्या मुलींच्या शाळेचं भूमिपूजन करतील. बिडकीन औद्योगिक क्षेत्र, छत्रपती संभाजीनगर लोकार्पण आणि सोलापूर विमानतळाचे उद्घाटनही पंतप्रधान मोदी ऑनलाईन पद्धतीने करतील.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!